| 1) | मराठा व देशमुख समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रणी विवाह संस्था |
| 2) | केंद्रात फक्त मराठा समाजातील स्थळांची नाव नोंदणी होते . |
| 3) | केंद्रात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच बाहेरील राज्यातील व परदेशातील मराठा समाजातील हजारो मुला / मुलींची नाव नोंदणी |
| 4) | केंद्रातर्फे दरमहा 20 तारखेस प्रकाशित होणारे आनंद सुयोग नावाचे नवीन वधू-वरांच्या माहितीचे मासिक सर्व सभासदांना पीडीएफ (PDF) स्वरूपात व्हाट्सअप द्वारे पाठवण्यात येते. तसेच वेबसाईट वरून मासिक डाऊन लोड करण्याची सुविधा उपलब्ध. |
| 5) | केंद्राची स्वतःची वेबसाईट ऑक्टोबर 2000 पासून सुरू असून, सदर वेबसाईटवर मुला / मुलीचा बायोडाटा फोटोसह देण्यात येतो. |
| 6) | ई-मेल, व्हाट्सअप अथवा फोन वरून स्थळांची माहिती घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध. |
| 7) | नाव नोंदणी नंतर स्थळांची माहिती लगेच मिळते. |
| 8) | केंद्राची मोबाईल सेवा - दर महिन्याला अहमदनगर, संगमनेर, छत्रपती संभाजी नगर, धुळे, जळगाव येथे कॅम्पचे आयोजन केले जाते. केंद्राचे कॅम्प च्या तारखा केंद्राचे वेबसाईट वरील मुखपृष्ठावर नमूद करण्यात येतात. |
| 9) | कॅम्पचे ठिकाणी नाव नोंदणी केली जाते, तसेच केंद्राचे सभासदांना स्थळांची माहिती व फोटो कॉम्प्युटरवर पाहता येतात. |
| १) | वधू वर सूचक केंद्रात नाव नोंदणीसाठी खालील प्रमाणे फी नाव नोंदणी करताना सुरुवातीला भरावी लागते. ( सदर फी एक वर्षासाठी असते.) | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २) | एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ३) | संपूर्ण फी भरल्याशिवाय केंद्रातून स्थळांची माहिती मिळणार नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ४) | केंद्रात फक्त मराठा देशमुख समाजाच्या प्रथम/ घटस्फोटीत/ विदुर / विधवा अशा स्थळांची नोंदणी केली जाते. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ५) |
नाव नोंदणी साठी खालील प्रमाणे कागदपत्र पाठवावी.
किंवा ऑनलाइन फॉर्म देखील आपण भरू शकतात whatsapp द्वारे देखील पाठवू शकतात
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ६) |
केंद्राची कार्यपद्धती :
केंद्रात नाव नोंदणी फी भरल्यानंतर प्रत्येक सभासदाला नोंदणी कार्ड दिले जाते.
केंद्रात स्थळांची माहिती घेण्यासाठी येताना आपले नोंदणी कार्ड बरोबर आणणे आवश्यक आहे. नाव नोंदणी केल्यावर सभासदांनी आतापर्यंत नोंदणी केलेल्या स्थळांमधून आपल्या मुलास / मुलीस अनुरूप असलेल्या स्थळांची माहिती घेऊन संबंधितांशी स्वतः संपर्क करावा. नाव नोंदणी केल्यानंतरच्या पुढील महिन्यापासून फक्त नवीन नोंदणी झालेल्या स्थळांचे आनंद सुयोग मासिक दर महिन्याच्या अखेरपर्यंत PDF स्वरूपात WHATSAPP वर पाठवले जाते. मासिकाची प्रत हवी असल्यास, कार्यालयातून कार्यालयीन वेळेत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आपणास घरपोच स्थळे उपलब्ध होतात. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ७) | केंद्राची स्वतंत्र वेबसाईट असून सदर वेबसाईटवर मुला / मुलींची फोटोसह संपूर्ण माहिती देण्यात येते. वेबसाईटवर फोटो सह माहिती ठेवल्यास आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपला नोंदणी क्रमांक सांगितल्यास ते आपली माहिती वेबसाईटवर पाहू शकतात. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ८) | केंद्राच्या मासिकात व वेबसाईटवर स्थळांचे पत्ते / फोन नंबर दिलेले नसतात तरी सभासदांनी मासिक / वेबसाईट पाहून आपल्या स्थळास अनुरूप असलेल्या स्थळांचे नोंदणी क्रमांक केंद्रात संयोजकांना कळवून त्या स्थळांची माहिती घ्यावी. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ९) | मासिकातील वेबसाईट वरील अनुरूप स्थळांच्या बायोडाटा मधील फक्त नाव, फोन नंबर, व पत्ता दिला जाईल. एकावेळी अनुरूप असलेल्या 5 स्थळांची माहिती व्हाट्सअप द्वारे दिली जाईल. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १०) | व्हाट्सअप द्वारे स्थळांची माहिती घेताना केंद्राकडे नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावरूनच माहिती घ्यावी. रजिस्टर नसलेल्या मोबाईल वरून माहिती मागविल्यास माहिती दिली जात नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ११) | सभासदांनी फोन करतांना कार्यालयीन वेळेतच ( सकाळी 11 ते 6 ) या वेळेत करावा. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १२) |
केंद्राच्या आनंद सुयोग या मासिकात पीडीएफ (PDF) फाईल मध्ये आपल्या स्थळांची माहिती नाव नोंदी नंतरच्या पुढील महिन्याच्या मासिकात फक्त एकदाच केंद्राचे वतीने मोफत दिली जाते.
त्यानंतर आपणास आपल्या स्थळांची माहिती जाहिरात पुन्हा पुढील महिन्याचे मासिकात द्यावयाची असल्यास,
प्रतिमहा - रु 100
चार महिन्यांसाठी - रुपये 300 वार्षिक 900 रुपये भरून चौकटीत जाहिरात देता येते. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १३) | केंद्रातून सभासदांना एका वेळी आपल्या पाल्यास अनुरूप /मॅच होणाऱ्या 20 स्थळांचे बायोडाटा/ प्रिंट प्रति biodata रुपये 3 प्रमाणे दिले जातात. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १४) | केंद्रात किंवा कॅम्पात स्थळांच्या माहितीच्या फाईल पाहण्यासाठी सभासदांना देण्यात येतात. तेव्हा सदर फाईल मधून स्थळांची कोणतीही माहिती परस्पर लिहून घेता येणार नाही, तसेच फाईल मधील माहितीचा फोटो काढता येणार नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १५) |
विवाह योग केंद्रातर्फे अथवा स्व प्रयत्नाने जुळून आल्यावर त्यासंबंधीची माहिती केंद्र संयोजकास विना विलंब कळवावी.
जेणेकरून इतरांचा तुमच्याशी संपर्क करण्यात वेळ, शक्ती व पैसा वाया जाणार नाही. केंद्रातर्फे विवाह योग जमल्यास केंद्रास देणगी द्यावी लागत नाही . |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १६) | वधू वर सूचक दोन्ही पक्षांकरिता सारख्याच आत्मीयतेने व प्रामाणिकपणे काम करतो तरी दोघांनीही आपल्या स्थळाबद्दलची खरी खरी माहिती नोंदणी फार्म मध्ये लिहावी, ही प्रत्येक सभासदांची नैतिक जबाबदारी आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १७) | आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतः तसेच आपले नातलग मित्रमंडळी यांचे मार्फत करून घ्यावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्या संयोजक जबाबदार राहणार नाही. वधू वर सूचक फक्त स्थळे सुचवतो स्थळांची वागणूक, नीतिमत्ता, चारित्र्य, इत्यादी व बायोडाटा मध्ये लिहिलेली सर्व माहितीची खातरजमा सत्यता सभासदांनी स्वतः स्थळ निश्चित करण्यापूर्वी करून घ्यावी, ती सर्वस्वी जबाबदारी सभासदांची आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १८) | नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची हमी वधू वर सूचक देऊ शकत नाही. विवाह लवकर जुळणे हे दोन्ही पक्षांकडून योग्य तो प्रतिसाद मिळणे व तडजोड करण्याची सामंजस्य वृत्ती दाखवणे यावर जास्त अवलंबून आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| १९) | पालकांनी मुला / मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत व शारीरिक अनुरूपता (वर्ण, उंची, रंग, दिसण्यातील आकर्षकता, अंगकाठी) व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळे निवडावीत. आपल्या स्थळांची योग्यता व आपल्या परिस्थितीला साजेशा व अनुरूप अशा स्थळांची निवड करावी व थोड्याफार प्रमाणात तडजोडीची भूमिका स्वीकारल्यास निराशा पदरी येत नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २०) | केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये, तसे आढळल्यास संबंधिताचे सभासदत्व रद्द केले जाईल. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २१) | पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक आल्यावर चांगले स्थळ नाकारणे या गोष्टीस विज्ञानाची मान्यता नाही. त्यामुळे ह्या गोष्टींवर विश्वास ठेवून स्थळास नकार देणे योग्य नाही. पत्रिकेतील गुणांपेक्षा मुला-मुलींचे प्रत्यक्ष अंगीचे गुण पाहावे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २२) |
सुहास शिर्के पुणे यांचे केंद्र हे आमच्या केंद्राचे सहयोगी केंद्र आहे. आमचे दोन्ही केंद्राचे सर्व बायोडाटा व फोटो एकमेकांकडे
पाठविण्यात येतात.
मात्र आमच्या केंद्राचे सभासदांचा बायोडाटा पुण्याच्या www.anandmaratha.com या वेबसाईटवर दिला जात नाही. तसेच त्यांच्यापण सभासदांचे फोटो व बायोडाटा आमच्या www.marathamarriage.com या वेबसाईटवर दिला जात नाही. मात्र पुण्याच्या वेबसाईटवरील स्थळांची माहिती आमच्या केंद्राकडून दिली जाते. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| २३) | एकदा भरलेली फी कुठल्याही सबबीवर परत दिली जाणार नाही. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| वरील नमूद केंद्राचे नियम व अटी मान्य असतील तर त्यांनीच या केंद्रात नाव नोंदणी करावी नंतर कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही. | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||