Top-Part

About us

Annasaheb Shinde

मराठा वधूवर सूचक व सल्ला केंद्र नाशिक या महाराष्ट्रातील नामांकित विवाहसंस्थेचे संस्थापक , माझे वडील कै. आण्णासाहेब शिंदे यांनी जानेवारी १९९९ मध्ये मराठा समाजातील वधुवरांसाठी या विवाह संस्थेची स्थापना नाशिक येथे केली.

वन विभागामध्ये ३६ वर्षे सेवा करून "वनक्षेत्रपाल" या पदावरून १९९३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठा समाजातील मुलामुलींची लग्ने जमविण्यास येणाऱ्या अडचणींचा विचार करून सदर विवाह संस्थेची स्थापना केली. शिक्षणामुळे नोकरी व्यवसायानिमित्त मूळ गावाकडील भाऊबंद / नातलग यांच्याशी असलेला संपर्क कमी झाल्याने, मुला-मुलींचे शिक्षण वाढल्याने मुलामुलीच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा देखील उंचावल्या.

मराठा समाजात लग्न जमविताना काही अनिष्ट प्रथा चालीरीती रूढ होऊ लागल्या. त्या संदर्भात आण्णांनी अशा पालकांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून देऊन समाज प्रबोधनाचे मोठे काम केले. उदा. जन्मकुंडलीचा आग्रह धरणे, मुलामुलीची नाडी एक असणे, नुसत्या कुळावरून मामा भाची नाते मानणे. यासारख्या अंधाश्रद्धांपायी पालक आपल्या मुला-मुलींसाठी हातचे चांगले स्थळ सोडून देतात आणि स्वतःच्या पाल्याच्या विवाहात अडथळा निर्माण करतात. या सर्व गोष्टींची जाणीव आण्णांनी या केंद्राच्या माध्यमातून मराठा समाजातील पालकांना वेळोवेळी करून दिली. मराठा वधूवर सूचक व सल्ला केंद्राचे वतीने प्रत्येक वर्षी दर ३ महिन्यातून एकदा मुला/मुलींचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. केंद्राचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले असून केंद्राची स्वतंत्र वेब साईट http://www.marathamarriage.com या नावाने सुरु करण्यात आली असून त्याद्वारे सभासदांना अनुरूप माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे. या शिवाय दरमहा "आनंद सुयोग" या मासिकाद्वारे प्रत्येक महिन्यात नोंदणी झालेल्या मुला-मुलींची माहिती घरपोच पोष्टाद्वारे तसेच Email द्वारे उपलब्ध करून दिली जाते.

केंद्राच्या वतीने महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये दर शनिवार-रविवारी कॅम्पची सेवा उपलब्ध करून दिली जाते. या कॅम्पच्या ठिकाणी सभासदांना स्थळांची माहिती संगणकाद्वारे फोटोसह दाखविण्यात येते. सदर कॅम्प धुळे, जळगाव, औरंगाबाद , अहमदनगर, संगमनेर, मुंबई इत्यादी ठिकाणी सध्या सुरु आहे. सभासदांना आपल्या मुला-मुलींसाठीसाठी स्थळांची निवड करण्यासाठी केंद्राची मोठी इमारत सर्व सोयीनी युक्त असून तेथे केंद्राचे स्टाफचे सहकार्याने आवश्यक ती माहिती सभासदांना तात्काळ उपलब्ध करून दिली जाते. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या दरम्यान सभासदांना कार्यालय खुले असून त्याशिवाय फोन / Email द्वारे बाहेरचे जिल्ह्यातील सभासदांना आवश्यक ती माहिती पुरवण्यात येते.

केंद्राच्या या सुविधांमुळे व माध्यमातून पालकांना आपल्या पाल्यासाठी विवाह जमविल्यास फार मोठा आधार मिळाल्याने अल्पावधीतच सदर केंद्राचा नावलौकिक महाराष्ट्रात आजमितीस असून त्यासाठी आमचे वडील कै. आण्णासाहेब शिंदे यांचे फार मोठे योगदान आहे.

दुर्दैवाने आण्णांचे निधन दि. २४-१०-२०१२ रोजी झाल्याने फार मोठी हानी आमच्या कुटुंबासह सर्व सभासदांची झाली आहे. मात्र कै. आण्णांनी ही विवाहसंस्था आपल्या अथक परिश्रमाने / कष्टाने मोठी केली. मराठा समाजातील सर्व पालकांचा / पाल्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासास पात्र होऊन अखंड सेवा देत राहिले त्याच भावनेतून / त्यांच्या आशीवार्दाने आण्णांचे हे कार्य या पुढे अखंड सुरु राहणार असून या विवाह संस्थेचे कामकाज मी व माझ्या मातोश्री कै. आण्णासाहेब शिंदे यांच्या पत्नी इंदुमती (आण्णासाहेब) शिंदे या पाहणार असून ज्या भावनेने / प्रेरणेने आण्णासाहेबांनी या विवाह संस्थेचे माध्यमातून मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह जमविण्यासाठी परिश्रम घेतले, त्याच भावनेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने यापुढे सुरु ठेवल्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.

मराठा समाजातील सर्व पालकांचे प्रेम/विश्वास आण्णासाहेबाना मिळाले ते प्रेम /विश्वास /स्नेह यापुढे मला , माझ्या आईस तुमच्याकडून मिळेल यात किंचितही शंका नाही. "मराठा समाज वधूवर सूचक व सल्ला केंद्र, नाशिक या विवाह संस्थेच्या कामकाजाविषयी समाजबांधवांच्या काही सूचना अभिप्राय असल्यास त्या मला अवश्य कळवाव्यात. आपल्या विधायक सूचनांचा निश्चितच समावेश मंडळाच्या कामकाजांत करण्यात येईल.

धन्यवाद.
आपले स्नेहांकित

श्रीमती इंदुमती (आण्णासाहेब शिंदे)
९८८१७९३९१२
संचालिका
मराठा वधूवर सूचक व सल्ला केंद्र, नाशिक

श्री सुहास आण्णासाहेब शिंदे
९८९०२०२७३४